जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नशिराबाद येथे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) तथा बौद्ध पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ मे२०२३ ते २२ में २०२३ पर्यंत बौद्ध पौर्णिमा च्या औचित्य साधून दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे तथागत बुद्ध विहार नशिराबाद येथे आयोजन करण्यात आले या शिबिराला प्रवज्जा विधी प,पू, भन्ते सुमेध बोधी भारतीय बौद्ध महासभा नाशिक यांच्या हस्ते करण्यात आली.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयु.के,वाय, सुरवाडे नाशिक विभाग सचिव भारतीय बौद्ध महासभा व कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा या कार्यक्रमाला ४३ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता यावेळी त्रिसरण पंचशील दिले या शिबिरामध्ये धम्माचा संस्कार पंचशील अष्टशील दहा पारमिता चार आर्य सत्य पंचात्तर शेकिया याचा अर्थ व धर्मगुरू जगणे व शील कसे पालन करणे याचे शिकवण देण्यात आले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाला सुमंगल अहिरे गुरुजी तसेच बी एस पवार सर प्रवीण डांगे गुरुजी आर के बोदडे अरुण तायडे रवींद्र अहिरे विजय घोरपडे सर संजय सावळे मीराताई तायडे तसेच अंधश्रद्धा या विषयावर जादूटोणाविरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन याचे मार्गदर्शन प्रकाश सरदार यांनी केले यावेळी शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मातोश्री रमाई आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, समता क्रांतीनगर, पंचशील नगर, पंचशील कॉलनी, मुक्तेश्वर नगर, बौद्ध पंच मंडळ उपासक उपासिका या सर्वांनी समारोपाच्या वेळी आपापल्या कॉलनी फुलांची उधळण रांगोळी काढून भिक्षु संघाचे रॅलीचे स्वागत करण्यात आले संध्याकाळी चिवर उतरवण्याच्या वेळी बुद्ध पूजा देसनावर धम्म सूत्र पठण करण्यात आले यावेळी शिबिरार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केवाय सुरवाडे गुरुजी यांनी केले तर आभार बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी मानले.


