यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी (संजय कारवटकर)
कल्यानकारी मंडळाच्या सक्रीय बांधकाम कामगारांना दरवर्षी दिवाळी बोनस जाहीर करण्यात यावे व पेटीचे वाटप करण्यात यावे तसेच कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असताना विलंब होत आहे यवतमाळ जिल्ह्यात अनेक नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्यांना कल्यानकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असताना विलंब होत आहे .तसेच दाव्याच्या अर्जातील त्रुटी दुरूस्ती करूनही सर्व बरोबर असतांना सुद्धा वारंवार स्पष्टीकरन मागविण्यात येत आहे.[ads id="ads1"]
त्यामुळे बांधकामगारांच्या पाल्याना शिष्यवृती वेळेवर मिळण्यास विलंब होत असल्याची ओरड होतानी दिसत आहे हे मात्र विषेश म्हणजे गेल्या दोन वर्षां आधी मंडळाच्या अध्यक्षाने कामगारांना 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर केले होते परंतू अद्याप पावतो कामगारांना दोन वर्षाच्या दिवाळी होऊन गेल्या तरीही त्यांना दिवाळी बोनस मिळाली नाही म्हणून जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांनी कामगार दिनाचे औचित्य साधुन शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी बाभूळगाव येथे एक दिवसीय कामगार मेळाव्याचे आयोजन केले.[ads id="ads2"]
त्यामध्ये जिल्ह्यातील फक्त संघटणेच्या नोंदणीकृत सभासदांची एक यादी तयार करून कामगारांना दिवाळी बोनस 5000 रुपये व संसारी उपयोगी भांडे देण्या ऐवजी त्यांच्या खात्यात 5000 वळती करण्यात यावे याकरिता मा. राहूल आर काळे सरकारी कामगार अधिकारी साहेब यवतमाळ यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मा डॉ खाडे साहेब यांना दिनांक 16 मे रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी कामगारांची यादी सह निवेदन दिले आहे.