यावल (सुरेश पाटील)
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय पदाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षलदादा पाटील यांची यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तसेच यावल तालुक्यातील पश्चिम भागातील तथा चोपडा- यावल विधानसभा मतदारसंघातील किनगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व व्यवसायिक बबलू उर्फ दगडू जनार्दन कोळी यांची उपसभापतीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित झाल्याने रावेर- यावल आणि चोपडा यावल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.[ads id="ads1"]
आज(दिनांक 18 ) सकाळी 11 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण तसेच त्यांचे सहकारी भारंबे,बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे योगेश चौधरी यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वानुमते हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापती म्हणून बबलू उर्फ दगडू कोळी यांची निवड करण्यात आली. सर्वात प्रथम निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण बाजार समितीचे सचिव सोनवणे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.[ads id="ads2"]
बैठकीत नवनिर्वाचित संचालक हर्षल गोविंदा पाटील,नारायण शशिकांत चौधरी,उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत,उमेश प्रभाकर पाटील,राकेश वसंत फेगडे, सागर राजेंद्र महाजन,पंकज दिनकर चौधरी,संजय चुडामण पाटील,सौ.कांचन ताराचंद फालक,सौ.राखी योगराज बराटे, दगडू उर्फ बबलू कोळी,यशवंत माधव तळेले,विलास चंद्रभान पाटील,सूर्यभान निंबा पाटील,अशोक त्रंबक चौधरी, सैय्यद युनूस सय्यद युसूफ, सुनील वासुदेव बारी हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
बैठकीत माजी सभापती हिरालालभाऊ चौधरी, पुरुजीत चौधरी,जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता भालेराव,माजी पंचायत समिती उपसभापती दीपक अण्णा पाटील,सरपंच अजय भालेराव,अतुल भालेराव, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज उर्फ बाळू फेगडे,माजी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, भाजपा शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे,व्यंकटेश बारी, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले.