रावेर प्रतिनिधी (प्रशांत गाढे) विटवा-निंभोरासिम बायपास रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडलेले असून "रस्ता आहे का मृत्यूचा सापळा" अशी परिस्थिती तयार झालेली आहे . सदर रस्ता हा मुक्ताईनगर व रावेर या दोन तालुक्यांना जोडणारा असून या रस्त्याने विद्यार्थी, शेतकरी,व्यापारी,तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत असतात.[ads id="ads1"]
विशेष बाब म्हणजे अशी की हा रस्ता संत मुक्ताबाई या तीर्थ स्थानावर जाण्यासाठी भाविक मोठया प्रमाणावर या मार्गाचा वापर केला जातो. विटवा, निंबोल,ऐनपुर, खिर्डी व इतर गावातील नागरिक देखील याच रस्ते ये - जा करीत असतात.व शेतकरी शेतातील शेतमाल वाहून नेण्यासाठी साठी या रस्त्याचा वापर केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ग्रामस्थांना सह प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. [ads id="ads2"]
सुमारे एक ते दीड केली किलोमिटर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असून या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली असून प्रवाशांना व वाहनधारकांना मोठी डोके दुःखी ठरत आहे.मोठे खड्डे असल्या मुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्यांची संख्या मोठी असल्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक वेळा खड्डे वाचवण्यात अपघाताला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
प्रवासी व नागरिक या रस्त्याची दुरावस्था पाहता या कडे प्रशासन व लोकप्रतिनधींनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.रावेर व मुक्ताईनगर या दोन्ही तालुक्याला एक खासदार,आणि तीन आमदार असून देखील या रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. तरी या रस्त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावावा अशी नागरिकांना कडून मागणी होत आहे.


