राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या शालिनी तायवाडे यांचा दणदणीत विजय

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी (संजय कारवटकर)

् राळेगाव तालुक्यातील पोटनिवडणूक लागलेल्या या अटीतटीच्या लढतीत वनोजा येथील पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या सौ.शालिनी  प्रफुल्ल तायवाडे यांचा दणदणीत विजय झाला असून ही निवडणूक जरी पोटनिवडणुक असली तरी नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली असतांना या निवडणुकीत दहा मतांनी काॅग्रेसच्या उमेदवारांचा विजय हा नक्कीच पुढील येणाऱ्या निवडणुकीत विजयाचे गणित देणारी निवडणूक समजली जात असून[ads id="ads1"]  या पोटनिवडणुकीत काॅग्रेस पक्षाचे  वनोजा येथील सहकार क्षेत्रातील मुरब्बी नेतृत्व डॉ.पुरूषोत्तम उगेमुगे  यांनी नियोजन करून ही निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी  वनोजा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, सरपंच सौ. चंदाताई पोटरकर, उपसरपंच प्रभाकर दांडेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय आत्राम,मालूताई  कोटनाके, संतोष वाघाडे,[ads id="ads2"]  मोरेश्वर वटाणे, किशोर चिंचोणे,शरद पोटूरकर, वासुदेव गुडधे, गणेश भटकर,विजय येणोरकर,विकास बुरले,सतिश बुरले, नामदेव खोडे, विशाल काचोळे,अनिल बुरघाटे, उत्तम काचोळे यांनी प्रफुल्ल तायवाडे यांनी अथक परिश्रम घेतले असून विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे ‌.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!