रावेर तालुक्यातील"या" गावातील २४ वर्षीय युवक हरवला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर ग्रामीण प्रतिनीधी (प्रशांत गाढे) निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच दसनूर येथे कंपनीच्या कामा निमित्त गेलेला २४ वर्षीय युवक गोपाल भोला जाधव दि.०६ मे पासून हरवला असून याबाबत निंभोरा पोलिस स्टेशन मध्ये सागर गजाननराव डुकरे राहणार शेवती तालुका जिल्हा अमरावती यांच्या फिर्यादी वरून [ads id="ads1"]  निंभोरा पोलिसात गोपाळ भोला जाधव वय २४ सोबत सिल्वर कलरची MH१९ DZ ३९८३ नंबरची शाईन मोटारसायकल असून राहणार डोंगरगाव तालुका जिल्हा बऱ्हाणपूर हा दि.०६ मे रोजी सायंकाळी ०५:१० वाजता दसनूर तालुका रावेर येथून हरवला आहे. हरवल्याची नोंद करूण मिसिंग दाखल करण्यात आली आहे.[ads id="ads2"]  

 हरवलेल्या मुलाचे वर्णन  रंगाने गोरा चेहरा लांब दाढीवर जुने जखमांचे निशान अंगात पांढरा रंगाचा फुल बाईचा शर्ट पायामध्ये कळ्या रंगाचे बूट असे वर्णन असून असा युवक कोणाला आढळल्यास निंभोरा पोलिसात त्वरीत संपर्क साधावा असे निंभोरा पोलिसांनी कळवीले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ अब्बास तडवी हे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!