यावल-प्रतिनिधी (फिरोज तडवी)
एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाडळसे येथे घडला असून या माथेफिरूला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाडळसा गावात एका विवाहीत महिलेवर तरूणाने चाकुने वार करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला , या घटनेतील हल्ल्यात गंभीर जख्मी झालेल्या तरुणीस उपचारासाठी जळगाव दखल करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
या संदर्भातील मिळालेले ऋत्त असे की पाडळसा येथील एक २३ वर्षीय विवाहीत महिला ही दिनांक ९ मे २०२३ रोजी दुपारी तिन ते साडेतीन वाजेच्या सुमारास गावातील सार्वजनिक शौचालयात शौचास गेली होती.
त्या महिलेच्या घरासमोरच राहणारा २१ वर्षीय कल्पेश अशोक तायडे नांवाचा तरूण हा त्या महीलेचा मानसिक छळ करीत असे. ती एकटीच शौचालयास गेली असतांना याचा फायदा घेत कल्पेश तायडे याने तिचा पाठलाग करून शौचालयात तिला गाठले.[ads id="ads2"]
यावेळी तरूणाने त्याच्याकडील चाकुने त्या महिलेच्या पोटावर वार करुन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता सदर महीलेने चाकुचे वार वाचल्याने तिच्या मानेवर तिन ठीकाणी वार लागल्याने ती गंभीर जखमी झाली , सध्या तिच्यावर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या तरूणीने दिलेल्या फिर्यादी वरून संशयीत आरोपी कल्पेश तायडे याच्याविरुद्ध फैजपुर पोलीस ठाण्यात भादंवी ३२४ , ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पोलीस करीत आहे.



