रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील के-हाळे बु येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य राजेन्द्र अशोक इंगळे यांना समाजरत्न २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि १४ मे 2023 रोजी रावेर येथील फुले,शाहु, आंबेडकर बहउद्देशिय सेवाभावी संस्था व रावेर तालुका बौद्ध समाज यांचेतर्फे भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. [ads id="ads1"]
जीवनात तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन विविध क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकिय कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना समाज रत्न पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले. [ads id="ads2"]
यापैकी रावेर तालुकयातील के-हाळे बु येथील राजेन्द्र इंगळे,ग्रा.प. सदस्य हे गेल्या पंधरा वर्षा पासुन ग्रा.प.च्या माध्यमातून महापुरुषाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत pohcvinyaache सामाजिक कार्य करीत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत यंदाचा २०२३ यावर्षाचा पुरस्कार फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभाषी सस्था व तालुका बौद्ध समाज तर्फे तर्फे व जिल्हातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थीतीत प्रदान करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे वर रावेर तालुक्यासह संपुर्ण जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या