वटसावित्री पौर्णिमा निमित्त कुसुंबा येथे महिलांना वडाचे रोपांचे वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 कुसुंबे ता. रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा): कुसुंबा खुर्द तालुका रावेर येथील ग्रामंचायत चे वतीने वटसावित्री पौरणिमेनिमित्त गावातील सर्व महिलांना एकत्र करून रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाडके यांचे अध्क्षतेखाली वटपौर्णिमा साजरी करण्यात आली व गावातील २० महिला बचत गटांना वटवृक्षाच्या रोपांचे व ट्री गार्ड चे मोफत वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]

     सविस्तर वृत्त असे की, पर्यावरनाचे रक्षण करणे कामी जास्तीत जास्त झाडे  लावणेकामी ग्रामपंचयतीतर्फे वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असुन या मोहिमेत गावकऱ्यांचा सहभाग व्हावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व या कार्यक्रमात झाडे लाऊन त्याचे रक्षण करणे व  संगोपन करणे कामी या वृक्ष लागवडीला स्पर्धेचे रूप दिले असून बचत गटांनी सदर रोपटे त्यांचे सोईचे ठिकाणी लावायचे आहे व तीन वर्ष या झाडाचे संगोपन करायचे आहे.[ads id="ads2"]

  तिन वर्षानंतर ग्रामपंायतीतर्फे या झाडांची पाहणी केली जाईल व ज्या बचत गटांनी या झाडाचे योग्य संगोपन केले असेल अशा बचत गटांचा सार्वजिकरीत्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून साळी चोळी देऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या मोहिमेला गावातील सर्वच महीलानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रावेर तालुका कृषी अधिकारी मा. भाऊसाहेब वाडके साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पर्यवेक्षक मा. सचिन गायकवाड साहेब, कृषी सहाय्यक संदीप बारेला साहेब, महिला बचत गट तालुका समन्वयक अंकुश जोषी साहेब, ग्रामसेवक श्रीमती रुबियाना तडवी मॅडम,  सरपंच श्री.मुबारक तडवी सर, उपसरपंच श्री.मुकेश पाटील, ग्रा. प. सदस्य श्री.प्रदिप सपकाळे, गफुर तडवी, सिंधूबाई जावळे, मैराज तडवी, कल्पना तडवी , पूजा पाटील, जूबेदा तडवी, माजी सरपंच नुरजाहा तडवी व गावातील सर्वच वीस बचत गटांच्या शेकडो महिला उपस्थित होत्या, 

हेही वाचा : यावल तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

या महिलांना कृषी विभागाकडून काही झाडांचे बियाणे सुद्धा वाटप करण्यात आले व पावसाळ्यात ते कसे जगवायचे याचे ही प्रा त्यक्षिक दाखवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मुबारक तडवी सर यांनी केले तर सूत्रसचालन प्रदिप सपकाळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी. आर. पी. सौ.ममता मोहन चौधरी, सौ.मंगला संजय पाटील, पशु सखी सौ.अनिता प्रेमचंद भालेराव, आशा वर्कर सौ.सुरेखा तडवी , सौ.दिपाली विनोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!