रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक ३ रोजी रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक 11. वाजता विश्रामगृह( रेस्ट हाऊस )रावेर येथे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात संपन्न झाली.[ads id="ads1"]
या बैठकीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांची आदिवासी हक्क परिषद 9 . जून फैजपूर येथे होत असून या परिषदेसाठी आदिवासी ,तडवी, भिल्ल , पावरा , पारधी तसेच बहुजन समाजातील सर्व घटकातील लोकांना ही परिषद कशासाठी असून हे कळले पाहिजे म्हणून रावेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिषदेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि ही परिषद कशी यशस्वी होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणामध्ये बाळू शिरतुरे म्हणाले.[ads id="ads2"]
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, जिल्हा संघटक याकूब शेख नजीर, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल तालुका संघटक कंदर सिंग भीमसिंग बारेला, अजय तायडे, सिताराम वानखेडे, निलेश दामोदर,, प्रतीक दामोदर बिट्टू दौलत अडांगळे या बैठकीला उपस्थित होते.


