छत्रपती संभाजीनगर येथे दुसरे राज्यस्तरीय सत्यधर्मीय विधीकर्ते शिबिर उत्साहात संपन्न !...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सत्यशोधक समाज संघाने महाराष्ट्रभर सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करावेत :- प्रा. कृष्णा मालकर

प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

संभाजीनगर - ९ जुलै २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्रातील दुसरं आणि मराठवाडयातील पहिलं सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्राचार्य कृष्णा मालकर यांनी उदघाट्न केले.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, अनिता देवतकर, संगिता खोबरे हे होते.[ads id="ads1"]

              खंडोबाची तळी उचलून व सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना म्हणून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण मान्यवरांनी केले. या प्रशिक्षणासाठी जळगाव, परभणी, जालना, बीड  व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मुख्य विधीकर्ते भगवान रोकडे व साळुबा पांडव यांनी सत्यधर्मीय पद्धतीने साखरपुडा, विवाह, गृहप्रवेश, दशपिंड, वर्षश्राद्ध इ.विधींचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींना  सहभाग पत्र, सत्यधर्मविधी पुस्तक  व सत्यधर्मीय दिनदर्शिका देण्यात आली.   [ads id="ads2"]

                     प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार यांनी केले. सत्यधर्माची प्रार्थना भगवान रोकडे मुख्य प्रशिक्षक यांनी म्हटली. सूत्रसंचालन रामेश्वर तिरमुखे यांनी केले व आभार प्रदर्शन जयप्रकाश चित्रे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साळूबा पांडव, रामेश्वर काळे, उमेश उबाळे, प्राक्तन पांडव यांनी परीश्रम घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!