"त्या" उखडून पडलेल्या रस्त्याचे कामाकरिता न.पा.सावदाने केले काम सुरू !

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


"सदरील समस्या न सुटल्यास येथील स्थानिक रहिवासी शिष्टमंडळासह मुक्ताईनगर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांना भेटणार असल्याची चर्चा त्या भागात जोर धरत आहे"

-------------------------------------

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

 सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील ताजुशशरिया नगर सह विविध ठिकाणी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने निधी सह मंजूर झालेले व लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले रस्त्यांचे खडीकरण या पहिल्या पावसाळ्यात वाहून गेल्याचे दिसून येते.तसेच या आधी सुद्धा सदरील रस्त्यांची दुरवस्था व निकृष्टा बाबत गेल्या मार्च महिन्यात समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान सह स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते यांनी देखील आवाज उठवला होता.[ads id="ads1"]

  तरी या बाबत रस्त्यांची दुरवस्था दर्शवणाऱ्या छायाचित्र सह "सावदा येथे लाखो रुपये खर्चून झालेल्या खडीकरणाचे पहिल्या पावसाळ्यात वाजले की बारा!" या मथळ्याखाली जनहिताकरिता  यंत्रणे सह संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी  दि.९ जुलै २०२३ रोजी स्थनिक वाहर्तारानी सविस्तर बातम्या प्रसारित करून यात सदरील भागातील रस्त्यांची पहिल्या पावसाळ्यात झालेली दुरवस्थाची पोल-खोल केली होती.या वृतांची  दखल घेऊन डायमंड हॉल शेजारी रस्त्यावर व मदिनानगर येथील एका रस्त्यावर तसेच मस्कावद रोडा पासून महुम्मदिया नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे सावदा पालिका तर्फे मुरुम टाकून बुजविण्याचे कामास सुरुवात झाली असली तरी सदर ठिकाणी टाकण्यात आलेले मुरूम  समाधानकारक व पुरेसे दिसून येत नाही.तसेच दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे ताजुशशरिया मस्जिद परिसरातील उखडून पडलेले  रस्त्यांचे वातावरण अतिशय चिखलमय बनल्याने इतर कामांसाठी घराबाहेर जाणे तर सोडा प्राथना स्थळात प्रार्थनेसाठी ये-जा करणे जिक्रीचे झाले आहे.[ads id="ads2"]

  व अशीच बिकट परिस्थिती पनापिर नगर,मुस्तफानगर,व ख्वाजानगर जवळील ८० फुट रस्त्याची बनलेली असून या भागातील दोन दिवसांपासून काही लाहन शाळकरी मुला मुली शाळेत देखील गेले नसल्याचे बोलले जात आहे.असे असताना सोशल मीडियावर स्वतःला विकास पुरुष दर्शवणारे सध्या स्थितीत समस्याग्रस्त भागात भिरकलेच नाही?त्यामुळे त्या विकास पुरुषाची खमंग अशी उलट सुलट चर्चा जोर धरत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!