यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल येथिल पंचायत समिती सभागृहामध्ये आज दिनांक :- 13/07/2023 रोजी विशेष मिशन इंद्रधनुष्य आढावा बैठक यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु याकूब तडवी यांच्या मार्फत घेण्यात आहे.[ads id="ads1"]
मिशन इंद्रधनुष्य या बाबत यावल तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती येण्यात येऊन दिनांक :- 7 ऑगस्ट 2023 रोजी या विशेष मिशन इंद्रधनुष्य या कार्यक्रमांस सुरुवात होणार असल्या कारणाने मोहीम राबविण्याच्या दुष्टीने मोहीम अंतर्गत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे त्यामुळे एकही लाभार्थी लसीकरणापासुन वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्यासाठी यावल तालुक्यातील आरोग्य कर्मचारी वर्गाला यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु याकूब तडवी यांनी आढावा बैठकीत विशेष मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहे त्या याप्रमाणे (.IMI-5.0.)-विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम-७ आगस्ट पासून सुरू होत असून त्याचे तीन राऊंड(फेरी) असतील.[ads id="ads2"]
१)पहिली फेरी-७ ते१२ आगस्ट
२)दुसरी फेरी-११ते१६ सप्टेंबर
३)तिसरी फेरी-९ ते१४ ऑक्टोबर
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील (० ते ५ वर्षाआतील ) व गरोदरमाता यांचे आशावर्करकडून घरभेटीद्वारे गाव/पाडा/वस्ती/झोपडपट्टी/शेतशिवार/बांधकाम/सूतगिरणी इ.ठिकाणी व्यवस्थितपणे सर्वेक्षण करण्यात यावे व सर्व लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून लसीकरण झालेले आहे किंवा सुटलेले/राहिलेले लाभार्थी असतील तर वयानुसार देय असलेली लस आपल्या दरमहा नियमित लसीकरण सत्राच्या ठिकाणी त्याचे लसीकरण करण्यात यावे व डु लिस्ट अपेक्षित यादी तयार करून मायक्रोप्लंन तयार करण्यात यावे व एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.अश्या प्रकारे यावल तालुका आरोग्य अधिकारी यांनी मिशन इंद्रधनुष्य बैठक बोलवून सूचना यावल तालुक्यातील आरोग्य कर्मचारी वर्गाला जारी केल्या आहेत. सदर बैठकित यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु याकूब तडवी यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली यावेळी बैठकीस यावल तालुका आरोग्य विस्तार अधिकारी डी.सी. पाटील, आशा बिसिएम प्रतिभा ठाकूर यावल तालुका आरोग्य सहाय्यक जयंत पाटील,तालुका डाटा ऑपरेटर प्रशांत शिंपी, यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यका,आरोग्य सेविका,सर्व आशा सुपर वाईझर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


