रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व च्या अंतर्गत शहर शाखा रावेर तर्फे महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रम दिनांक १३ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला शिबिरामध्ये एकूण 25 महिला प्रशिक्षणासाठी बसल्या होत्या. 4 जुलै ते 13 जुलै या कालखंडामध्ये शिबिर घेण्यात आले. [ads id="ads1"]
शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका आयु.नी करुणाताई नरवाडे होत्या. दहा दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर ताईंनी महिलांना प्रशिक्षण दिले. समारोपाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहराचे अध्यक्ष आद. राहुल डी.गाढे हे होते. तर प्रमुख उपस्थिती जिल्हा शाखेचे सरचिटणीस आनंद ढिवरे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, महिला विभाग उपाध्यक्षा प्रियंकाताई आहिरे, संरक्षण विभाग सचिव एस पी जोहरे, जिल्हा संघटक साहेबराव धुंदले, जिल्हा संघटक विजय अवसरमल, वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे, संघरत्न दामोदरे यांची होती.[ads id="ads2"]
महिला शिबिराचे सूत्रसंचालन आणि नियोजन शिबिरातील महिलांकडूनच करण्यात आले. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथून भन्ते दीपंकर महाथेरो आलेले होते. कार्यक्रमाला परिसरातील उपासक उपासिका योगेश गजरे,राजेंद्र अटकाळे धनराज घेते, महेंद्र तायडे,विशाल तायडे,गौतम अटकाळेमहेंद्र वानखेडे,संतोष तायडे,कैलास तायडे,संभाजी पाईकराव,अमोल हिवरे,विशाल वाघ,चेतन वानखेडे,लहान बालके बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वात शेवटी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली होती.


