विवरे ता. रावेर (संजय मानकरे) येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून पूर्णत्वास आलेल्या संत मुक्ताई निवासाचे लोकार्पण पंढरपूर येथील ह.भ.प. पांडुरंग महाले महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्ह्यातील पहिले संत निवास असलेले विवरे खुर्द गांव ठरले आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कामिका एकादशीच्या पावन मुहूर्तावर ह.भ.प. पांडुरंग महाराज, हभप गोपाळ महाराज विवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वरा पाटील होत्या.[ads id="ads1"]
ज्या भूमीत संताचा सन्मान केला जातो, तिथे संस्कार आणि संतांचे आशीवार्द कमी पडत नाही. विवरे गांव हे संतांची भूमी आहे. इथे संतांचा आदर केला जातो. त्यामुळे आध्यात्मिक वारसा या गांवाला लाभला आहे. असे अमृत विचार ह.भ.प. पांडुरंग महाले महाराज विवरे खुर्द (ता. रावेर) येथील संतनिवास लोकार्पण प्रसंगी प्रकट केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी हभप पांडुरंग महाराज यांच्या हस्ते फीत कापून संत निवासाचे लोकार्पण झाले. यावेळी पीपल्स बँकेचे व्हा.चेअरमन मानस कुलकर्णी, माजी पं. स. सदस्य योगिता वानखेडे, ग्रा.प. सदस्या मंगला बखाल, संदीप पाटील, ग्रा.वि.अधिकारी अतुल पाटील, माजी उपसरपंच अरुण विचवे, दामू विचवे, सीताराम विचवे, प्रभाकर विचवे, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर विचवे, भीमराव विचवे, रामकृष्ण महाजन, भगवान चौधरी, बिसन सपकाळ, माणिक महाजन, रामदास वानखेडे, भागवत येवले, बिबरे येथील भजनी मंडळ संतोष बखाल, गोपाळ चौधरी, निवृत्ती विचवे, रवींद्र पाटील, मिठाराम चौधरी, मुकेश महाजन, प्रकाश लोखंडे, विवरे बुद्रुक येथील अशोक मोपारी, लक्ष्मन चौधरी उपस्थित होते.
यावेळी सरपंच स्वरा पाटील, ग्रा.प. सदस्य संदीप पाटील, हभप गोपाळ महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील यांनी केले तर आभार वारकरी मंडळाच्यावतीने राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.


