यावल (सुरेश पाटील)
आज शुक्रवार दि.14 जुलै 2023 रोजी यावल वनविभाग प्रभारी उपवनसंरक्षक तथा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांचे अध्यक्षतेखाली व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाघझिरा परिमंडळातील कक्ष क्रमांक 147 यातील अतिक्रमण प्रवण क्षेत्रात मोहा जातीची 1000 रोपांची लागवड करण्यात आली.[ads id="ads1"]
यावेळी आयोजित कार्यक्रमात परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर वृक्षारोपण लागवड कार्यक्रमात स्थानिक आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.तसेच लागवड केलेली रोपे 100% जगण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले. [ads id="ads2"]
माननीय अध्यक्षांनी त्यांचे मनोगतात अतिक्रमणामुळे होणारे तोटे वन जंगलापासून होणारे फायदे तसेच गोंण वनपोजापासून मिळणारे उत्पन्नाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात प्रभारी उपवनसंरक्षक यावल तथा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे,पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे,मौजे आडगाव तालुका यावल येथील सरपंच, मनुदेवी संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील,माजी पंचायत समिती सदस्य भारशिंग बारेला,मौजे आडगाव येथील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य,मौजे मानापुरी येथील ग्रामस्थ,वनपाल वाघझिरा व राउंड स्टाफ यांनी सहभाग नोंदवला.


