"या अनुषंगाने आज दि.१४ जुलै रोजी स्थानिक वार्ताहर चर्चा करण्यास गेले असता प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी दिलीप पाटील सावदा यांनी सांगितले की,ज्या जमिनीला वरिष्ठ सक्षम अधिकारीची परवानगी असेल अशा व्यवहाराची नोंदणी होते.मात्र अशा खडे भूखंडाच्या व्यवहाराची अजिबात दस्त नोंदण्या होत नाही."
-----------------------------------------[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका हद्दीतील न.पा.चे आरक्षण असलेल्या व बिनशेती नसलेल्या शेत जमीनीत खडे प्लॉटी टाकून मनभावी पद्धतीने विक्री करण्याचा गोरखधंदा काही भूखंड माफिया कडून केला जात असल्याचे समजते.या अनुषंगाने पालिकेस तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहे.तरी सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ नये या उद्देशाने अशा अवैध खडे प्लॉटीचे व्यवहार कोणी कोणाकडून करू नये,[ads id="ads2"]वगैरे मजकूराचे उल्लेख असलेली जाहीर सुचना सावदा न.पा.मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दि.१ जुलै २०२३ रोजी एका दैनिकात प्रसारित देखील केलेली असून,तसेच दि.७ जुलै २०२३ रोजी मौजे सावदा येथील आरक्षण असलेल्या व बिनशेती नसलेल्या आणि पालिकेची अंतिम मंजुरी प्राप्त नसलेल्या त्या जमिनी व गटांतील प्लाटींची खरेदी-विक्रीची नोंदणी करू नये,असे पत्र सुद्धा सावदा दुय्यम निबंधक कार्यालयास सादर केलेले आहे.तरी सदरील प्रकारचे प्लॉटीचे व्यवहार करण्यास सर्वसामान्य जनतेने सावधगिरी बाळगावी हे मात्र खरे आहे.


