मा. संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात आंबेडकरी ऐक्य व्हावे. डॉ. राजन माकणीकर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुंबई  (प्रतिनिधी) रिपब्लिकन आणी सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना तसेच संस्थांनी मा. संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी ऐक्य कराव असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.[ads id="ads1"]

सेना, आघाड्या, पक्ष, संस्था व सर्व आंबेडकरी संघटनांनी वेगवेगळ्या गटा तटातून लढण्या ऐवजी मा. संदेश आंबेडकर साहेबां च्या नेतृत्वात आंबेडकरी ताकत दाखवावी व चाललेले गलिच्छ राजकारण सम्पुष्ठात आणून स्वाभिमानी व सत्तेचे राजकारण असेही तसेच मा. संदेश जिना कोणताही विकल्प न समजून आंबेडकरी मिशन व सत्तेचा संकल्प अस मानावे. असेही डॉ. माकणीकर म्हणाले.[ads id="ads2"]

डॉ. राजन माकणीकर असेही म्हणाले की, आप आपल्या गटांना घेऊन मर्यादित राजकारण करण्यापेक्षा सध्या आपसातील मतभेत हेवेदावे दूर करून कोणीही नेतृत्व न करता आपल्या अनुभवातुन राजकारणाला नवी दिशा द्यावी व मा. संदेश आंबेडकरांना ऐक्याचे नेतृत्व करू द्यावे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांचे पंतु असून मा. राजरत्न आंबेडकरांचे मोठे भाऊ आहेत. मा. संदेश आंबेडकर  यांना राजकारणातील आंबेडकरी नेतृत्वाची संधी दिली तर ते या संधीच नक्कीच सोन करून दाखवतील... 

आंबेडकरी संघटना व पक्ष प्रमुखांनां या संदर्भात पत्र देऊन राजकारणाला नवी कलाटणी देण्याचे काम अनुभवी राजकारण्यांनी करावे अशी विनंती आम्ही करनार असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!