रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनांक12/07/ 2023 या रोजी झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नवीन निंबोल तालुका रावेर येथे वृक्षारोपण सोहळा पार पडला.[ads id="ads1"]
सुरुवातीला वटवृक्षाचे वृक्षारोपण प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव विनोद हरी कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जि .प मराठी शाळेचे मुख्याध्यापक काही कारणास्तव हजार नसल्यामुळे तेथील आदर्श शिक्षक विनायक गुरुजी यांच्या हस्ते बाकीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.[ads id="ads2"]
वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यामागील कारण म्हणजे वडाचे एक झाडापासून एक कोटी ऑक्सिजन सर्व मानव जातीला प्राण्यांना पुरविले जाते. तसेच प्रत्येक दिवसाला विषारी वायू आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू हे झाड शोषून घेते, आणि सर्व प्राणीमात्रांना ऑक्सिजन वायू म्हणून प्राणवायू पुरविते.
तसेच वडाच्या झाडाचा उपयोग आयुर्वेद म्हणून औषधीसाठी केला जातो. त्यामुळे संपूर्ण भारतात वटवृक्षाला देवता म्हणून पुजले जाते. त्यामुळे वटवृक्षाचे महत्त्व खूप मोठे आहेत. जि प मराठी शाळेत वृक्षारोपण करताना उपस्थित आदर्श शिक्षक विनायक गुरुजी, शिक्षिका मराबाई पाटील, शिक्षिका वैशाली सोनवणे. तसेच इतर शिक्षक वर्ग वृक्षारोपण करताना त्या ठिकाणी उपस्थित होते.