नांदगाव,नाशिक प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गंगाधर येथील खैरनार वस्ती वरील हनुमान मंदिर येथे सभा मंडप देण्यात आला असून या सभा मंडपाची भूमिपूजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी शाल व पुष्पगुच्छ देत रामदास सुहास कांदे यांचे स्वागत करण्यात आले. श्री विष्णू निकम सर यांनी यावेळी नांदगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून बाराशे कोटी रुपये निधी खेचून आणला.जे याआधी कोणत्याही आमदाराला शक्य झाले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी बोलताना विकास कामासाठी कोणतीही शंका मनात न ठेवता तेव्हाही मला सांगा. मी आपल्या सेवेत हजर असल्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले. येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार गंगाधरी येथील खैरनार वस्ती ते खैर वस्ती, खैरेनगर अंतर्गत रस्ता व स्मशानभूमी चे काम लवकरच करून दिले जाईल असे आश्वासित केले. आपल्या वैयक्तिक कुटुंबातील सामाजिक, राजकीय कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करायला संकोच करू नका. मी आपल्याला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे यावेळी आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी श्री विष्णू निकम सर, डॉक्टर वाय पी जाधव, प्रमोद भाबड, गंगाधरी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश खैरनार, दिगंबर भागवत, वसंतराव सोनवणे, नंदू खैरनार, सुनील जाधव, अमोल खैरनार, गणेश खैरनार, डॉक्टर मधुकर खैरनार, संदीप खैरनार, दीपक खैरनार, संजय खैरनार, वैभव खैरनार, बाळकृष्ण खैरनार, महेश ईघे, विजय इप्पर, सोपान जाधव, महेंद्र गायकवाड, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगीरथ जेजुरकर यांनी केले.