रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.की,रावेर येथील नविन विश्राम गृह ते जुना सावदा नाका या दरम्यान असलेल्या नागझिरी नदिवरील छोट्या फरशी पुलाचे बांधकाम सुमारे 80 ते 90 वर्षा पूर्वी झालेले असून सदर पुल अतिशय जिर्ण होवून त्याची उंची कमी झालेली असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरुन पुराचे पाणी वाहते त्यामुळे सदरील रस्ता बंद होवून नागरीकांचे अतोनात हाल होतात. त्याच प्रमाणे नदीचे दोघ बाजुने संरक्षण भिंत बांधणे पुलाचे एका बाजुने गायत्री नगर गट नं.701 आहे.तर दुस-या बाजुने गुरुदेव नगर गट नं.739 आहे. या दोघ नगरामध्ये नागरीक वास्तव्य करीत आहे.[ads id="ads1"]
सदर रस्ता हा जळगांव, भुसावळ, फैजपूर, सावदा या शहरातील रस्त्याने तसेच ग्रामिण भागातील रस्त्याने जोडला असल्यामुळे. तसेच या दस्त्यावरून पुढे रावेर रेल्वे स्टेशन, रावेर पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय रावेर, दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर, ग्रामिण रुग्णालय, रावेर, तालुका कृषि कार्यालय, रावेर, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, रावेर, जि.प. सिंचन विभाग रावेर, रावेर तालुका खरेदी विक्री संघ कार्यालय रावेर, इत्यादी सह शहारातील सर्व शाळा व विद्यालये या रस्त्याने पुढे जाऊन मिळतात. त्यामुळे सदर रस्त्यावरून नागरीकांची, अधिकारी वर्गाची , शालेय विद्याथ्यांची आणि ग्रामिण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.[ads id="ads2"]
परंतु सदर रस्त्यावर असलेल्या नागझिरी नदिवरील पुल हा अत्यंत जिर्ण झाला असुन त्याची उंची कमी असल्याने या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहते म्हणून नागरीकांच्या जिवास कायम धोका असतो. नुकत्याच दि. 5/07/2023 रोजी सातपुडा डोंगरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात तीन लोकाचा मृत्यु झालेला आहे. त्या पैकी रावेर न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष,संचालक रावेर शिक्षण संवर्धक संघा संस्थेचे स्व.सुधीर गोपाळ पाटील यांचा देखिल दि. 5/07/2023 रोजी पुलावरुन घरी जात असतांना अचानक पाण्याचा लोंढा येऊन त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते रात्री वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे
वारंवारघडलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या भावना तिव्र होवून प्रशासना विरुध्द नाराजी निर्माण होत आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर पुल पाडून नविन उंच पुल बांधणे आवश्यक झालेले आहे.त्याच प्रमाणे नदीचे दोघ बाजुने संरक्षण भिंत बांधणे नदीच्या एका बाजुला गायत्री नगर गट नं.701 आहे.तर दुस-या बाजुने गुरुदेव नगर गट नं.739 आहे.या दोघ नगरामध्ये नागरीक वास्तव्य करीत आहे.त्या मुळे नागरीकाना पुर आला की, जिव मुठीत घेऊन जगावे लागते.केव्हा केव्हा तर रात्री जागरण करावे लागते. कारण पाणी आपल्या घरात तर घुसणार नाही ना या चिंतेमुळे दोघ कॉलन्यातील नागरीक त्रस्त आहे.तरी शासनाने पुलाचे काम त्वरीत सुरु करुन पुलाचे दोघ बाजुने संरक्षण भिंत आदित्य इंगलीश मॅडियम स्कुल पर्यत बांधुन नागरीकाची ही समस्या युध्दपातळीवर सोडवावी व लवकरात लवकर कामाची सुरुवात करावी या मांगणीसाठी जिल्हाधिकारी सो.अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना विनोद नारायण तायडे,राजेंद्र मधुकर अटकाळे,पुंडलिक कोंघे,मयूर तायडे,अतुल अटकाळे,गोपाळ मिस्त्री,महेंद्र लोंढे, सचिन पाटील,हिरामण चौधरी, रघुनाथ कोंघे, अनिल रायमळे, पवन श्रीनामे, जयंता महाजन,व समस्त गुरुदेव नगर मधील व गायत्री नगर मधील बहुसंख्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.