फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथील गेल्या आठ दिवसापासून बस स्थानक जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे बस्तानका मागील मिरची ग्राउंड कॉलनी मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती त्यामुळे या ठिकाणी पाईपलाईन चोकअप काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या गटारी उघड्यावर पडली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरात मनमानी कारभार सुरू आहे.[ads id="ads1"]
पिण्याच्या पाईपलाईनचे काम झाले परंतु गटार उघड्यावर पडली असून बसस्थानक मधून येणाऱ्या एसटी बसचा मार्गच बंद झालेला असून एकाच मार्गाने महामंडळाच्या बसेस ये जा करीत आहे त्यामुळे एसटी बस सह प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.[ads id="ads2"]
गेल्या आठ दिवसापासून उघड्यावर पडलेले गटारीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच एसटी बस स्थानकात येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे नगरपरिषदेच्या अशा गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहे या गटारीची त्वरित दुरुस्ती करावी आणि नागरिकांना होणारा त्रास त्वरित मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे