"तसेच सदरील शेत जागा क्रीडांगण साठी आरक्षित असून त्यावर सार्वजनिक क्रीडांगण उभारण्यात यावे.अशी मागणी लवकरच सावदा मुख्याधिकारी,प्रांत अधिकारी,जिल्हाधिकारी सह मतदारसंघातील आमदार आणि राज्याचे क्रीडामंत्री,महसूल मंत्री यांच्याकडे क्रीडा प्रेमी सह शहरवासीयाकडून केली जाणार असल्याची खात्री लायक माहिती समजली आहे."[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका हद्दीतील न.पा.चे आरक्षण असलेल्या व बिनशेती नसलेल्या शेत जमीनीत खडे प्लॉटी टाकून मनभावी पद्धतीने विक्री करण्याचा गोरखधंदा काही भूखंड माफिया कडून केला जात असल्याचे समजते.या अनुषंगाने पालिकेस तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहे.तरी सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ नये या उद्देशाने अशा अवैध खडे प्लॉटीचे व्यवहार कोणी कोणाकडून करू नये,म्हणून सावदा न.पा.मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी कायदेशीर जाहीर सुचना देखील एका दैनिकात प्रसारित केलेली असून,तसेच पालिकेची अंतिम मंजुरी प्राप्त नसलेल्या अशा जमिनी व गटांतील प्लाटींची खरेदी-विक्रीची नोंदणी करू नये,असे पत्र सुद्धा सावदा दुय्यम निबंधक कार्यालयास सादर केलेले आहे.[ads id="ads2"]
परंतु सावदा येथील मरी माता मंदिर मागील आरक्षित जागेवर पालिकेची परवानगी न घेता थेट समरी पावरचा वापरून भुखंड माफीयांनी कंपाऊंड वॉल बांधकाम केलेले आहे.तसेच सध्या या आरक्षित जागेवर खुलेआमपणे आखटणीचे काम खडे प्लॉटीचा गोरखधंदा करण्यासाठी केले आहे.सदरीचा गैरप्रकार पुराव्यानिशी वेळोवेळी तक्रारदारांनी समक्ष भेटून मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर सुद्धा त्यांनी अद्यापही या अनुषंगाने कोणतीच ठोस कायदेशीर भूमिका घेतली नसून,फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने(आमचा कारभार खरा आहे.)असे भोळ्या-भावड्या जनतेस भासवून खडे प्लॉटीचा गोरखधंदा सुरू ठेवण्यासाठी व लोकांची आर्थिक लुट करण्यासाठी अशा भूमाफियाना चांगली संधी मिळाल्याने या संधीचा सोना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उचलला जात असल्याचे बोलले जात आहे.याबाबत वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.मात्र
अशा आरक्षित व एन.ए.न झालेल्या जागा,गट आणि खडे प्लॉटिंचे व्यवहार बाबत जनतेने सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे.असे मत महसूल क्षेत्रातील जाणकाराकडून सुद्धा बोलले जात आहे.