शिबिराला तालुक्यातील उपासक, पदाधिकारी उपस्थित होते. कमी उपस्थितीचे कारण मोलमजुरी करणारे उपासक कामानिमित्त शेतात गेले असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित उपासक, कार्यकर्त्यांना जिल्हा शाखेकडून दिले गेलेले सर्व विषय सविस्तर पद्धतीने सांगितले गेले. यामध्ये बौद्धांची आचारसंहिता, बौद्ध सभासद नोंदणी अभियान, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अर्थात बीएसआय मिशन, शाखेचा जमाखर्च हिशोब इत्यादी विषय घेतले गेले. [ads id="ads2"]
तसेच उपासक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या व योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सरणत्तय घेऊन शिबिराचा समारोप करण्यात आला. सदर शिबिराला अशोक रघुनाथ अडकमोल, अनिल चिंतामण तायडे, दीपक कडू तायडे, विनोद काशिनाथ गजरे, सुरेश सुभान वाघ, सुहास भालेराव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिबिराचे मुख्य मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे सरचिटणीस आणि केंद्रीय शिक्षक आनंद ढिवरे होते.