यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी या ठिकाणी 15 ऑगस्ट ध्वजारोहनाचा कार्यक्रम नेहमी प्रमाणे आयोजित करण्यात आला होता यात प्रथमच यावल तालुक्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ध्वजारोहन करण्याचा मान प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र शिरसाड येथिल समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अस्मा परवीन नईमोद्दीन शेख यांना मिळाला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे कि प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ मनिषा महाजन यांच्या कडे प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथिल प्रभारी पदभार असल्यामुळे त्यांचे मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ मनिषा महाजन यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र शिरसाड येथिल समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अस्मा परवीन नईमोद्दीन शेख यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे ध्वजारोहन करून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.[ads id="ads2"]
प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र शिरसाड येथिल समुदाय अधिकारी डॉ अस्मा परवीन नईमोद्दीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र शिरसाड येथिल समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अस्मा परवीन नईमोद्दीन शेख यांना प्रथमच मान मिळाल्याने महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या तर्फे त्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथिल प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांचे ही अभिनंदन करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहन कार्यकामास प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक अरुण चौधरी,ओपडी आरोग्य सेविका रामा पवार, आरोग्य सेवक शेख सल्लाउद्दीन शेख अलिमोद्दीन,आरोग्य सेविका मनिषा कोळी,शेख नईममोद्दीन शेख, तालुका डाटा ऑपरेटर,शिपाई शेख रेहान अलिमोद्दीन शेख, अस्माबनो तय्यब अली,रुग्ण वाहिका चालक शेख शोएब शकील,डाटा ऑपरेटर, साकळी येथिल सर्व आशा ताई मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपस्थित असलेले सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत तंबाकू मुक्त भारत, व क्षयरोग मुक्त भारत शपथ घेण्यात आली.


