दीपनगर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- येथील शुभम मोहन सरदार हे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सन 2022 च्या परीक्षेत देशात 107 व्या तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला असून Central Armed force मध्ये Assistant Commandant पदी निवड झाल्याबद्दल आज 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांचे हस्ते कपिल नगर येथे ध्वजा रोहन करण्यात आला.[ads id="ads1"]
त्या नंतर ग्रुप ग्रामपंचायत निंभोरा ब्रु व पिप्रिंसेकम चे सरपंच रोहिणी कोलते, सदस्य विजय मालवीया, यासीन पठाण, उल्हास बोरोले,दिलीप बऱ्हाटे,माजी सरपंच प्रभाकर साळवे, सन्नी चाहेल,संजय भारंबे ग्राम विकास अधिकारी व सचिन भिरूड,नीता नरवाडे, चंदा खंडारे, अरुण भालेराव, राहुल वाघ, रमेश सिरसाठ, अंगणवाडी सेविका व मदतनीस इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक,त्रिरत्न बुद्ध विहार समिती,महिला मंडळ यांनी शुभम सरदार, वडील मोहन सरदार, आई सुनीता सरदार, काका प्रकाश सरदार व रविंद्र सरदार, काकू वैशाली सरदार, आत्या वनमाला हिवाळे, मामा समाधान हिवाळे संपूर्ण परिवाराचे स्वागत व अभिनंदन केले.[ads id="ads2"]
तर दीपनगर येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंते अशोक भगत, सुमेध मेश्राम, प्रशांत लोटके,औदयोगिक संबंधीत उपमुख्य अधिकारी मुकेश मेश्राम सर्व अधीक्षक अभियंता अतुल पवार, ए. एच. भगत, व्ही. एम. ढगे, ए. बी. घाडगे,
सुनिल पांढरपट्टे, सर्व कार्यकारी अभियंता,कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथील केंद्र संचालक किशोर पाटील इत्यादी नी हार्दिक स्वागत केले व शुभम सरदार चे कौतुक केले.
" परिसराला आभिमान वाटावा असे कार्य शुभम सरदार यांनी केले आहे " असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी यावेळी असे म्हटले तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार दीपनगर कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले


