यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंदभैया पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मोहराळा ता. यावल येथील किरण गोपाळ पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली.[ads id="ads1"]
यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील राष्ट्रवादी यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक चे यावल तालुकाध्यक्ष पवन पाटील आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी बाजार समिती संचालक डॉ अरुण पाटील उपस्थित होते. किरण पाटील हे मोहराळा विकासो चे संचालक असून या आधी त्यांनी युवक तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.सहकार क्षेत्रात व पक्ष संघटने मध्ये केलेले त्यांचे कार्य पाहून त्यांना ही बढती मिळाली आहे.


