पाल्यांचे शैक्षणिक नुकसानास कारणीभूत शाळा संचालकांवर गुन्हा दाखल व्हावा - सावदा पोलिस ठाण्यात अखेर पालकांनी दिली तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


आपल्या पांल्यांचे उज्वल ऐैवजी बेचिराख होत असलेले शैक्षणिक भविष्यची चिंता न बाळगणारे शाळा संबंधितांसह याकडे सतत दुर्लक्ष करणारे जळगाव जि.प.माध्य.शिक्षणाधिकारी व रावेर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी यांना दोषी धरण्यात यावे.अशी लेखी तक्रार सामोहिकरित्या जवळपास २०० गावकरी व पालकांनी सावदा पोलिस स्टेशन,शिक्षण उपसंचालक नाशिक,जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव यांच्याकडे नुकतीच केली आहे.तसेच सदर शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी सुद्धा गावात जोरधरत आहे.[ads id="ads1"] 

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेचा संपूर्ण कारभार सोयस्कररित्या फक्त आणि फक्त आपल्याच गटाच्या हाती रहावे, म्हणून संस्था चालकांमध्ये सन २०१८-१९ पासून सुरू असलेल्या कुचकामी वर्चस्व वादांमुळे शाळाचे पवित्रता नष्ट होवून,याच बरोबर येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे व होत आहे.या अनुषंगाने काही जागृत पालकांनी वेळोवेळी माध्य.शिक्षण विभाग जि.प.जळगाव व रावेर येथील गट शिक्षणाधिकारी यांना अर्ज सादर केले होते.मात्र सदर संस्था चालक व या अधिकाऱ्यांच्या दरम्यान चीरी मीरी सुरू असते,सबब कशा मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.म्हणून शाळेत संस्था चालकांची मनमानी चालत असते,तरी गेल्या ३ आगस्ट रोजी या शाळेचे संचालक तथा चेयरमन अक्रम खान अमानुल्ला खान याचे दुर्योधनी हात थेट एका अल्पवयीन विद्यार्थिनी पर्यंत पोचले,हे मात्र खरे आहे.तसेच ही अतिशय घृणास्पद घटना दाबण्यास शर्यतीचे प्रयत्न करणारे मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान सह दोन शिक्षकांचा सहभाग उघडकीस आला.परिणामी पिढीत विद्यार्थींनीच्या फिर्यादीवरून या चौघांच्या विरुद्ध ७ ऑगस्ट रोजी कलम ३५४,३५४(ए)१आय ३४ सह पोस्कोचे कलम ८,१७ अन्वे गुन्हा दाखल झाला.यानंतर मुख्य संशयित आरोपी अक्रम खान हा अटकेत असून उर्वरित ३ संशयित आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.यामुळे पालकांसह गावकऱ्यांमध्ये तिव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. [ads id="ads2"] 

तसेच संस्था चालकांमध्ये गट बाजी व त्यांचे सतत होणाऱ्या वादविवादात,म्हणजे संस्था अध्यक्ष सह संशयित आरोपी अक्रम खान आणि भुसावळ जि.प.उर्दु शाळेचे शिक्षक इक्बाल मन्यार यांनी(जीस की लाठी उस की  म्हैस)याला अनुसार सन २०१९ पासून मनमानी पद्धतीने शाळेचा कारभार सुरू ठेवला,यांचे  इतके गंभीर व विपरीत परिणाम झाले की,थेट यावर्षी झालेल्या १० वी बोर्डाची परीक्षेत या शाळेचे २८ विद्यार्थी फेल झाले व जे पास झाले होते त्या विद्यार्थ्यांना ११ (सांयन्स) मध्ये प्रवेश मिळाला नाही,तसेच या बोर्डाची परीक्षेत रावेर तालुक्यात असलेल्या इतर शाळेच्या तुलनेत या शाळेचा टेक्केवारी सुद्धा कमालीची घसरली असून,सदरी प्रकरणामुळे येथील ५ ते १० वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचे मनावर आघात झाला तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अशा प्रकारे मुलांचे झालेले व होणारे शैक्षणिक नुकसानास घेऊन पालकांमध्ये कमालीची चिंता सह संताप व्यक्त केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!