रावेर ग्रामीण रुग्णालय येथे तालुक्यातील आशा सेविकांची आरोग्य सेविकांकडून होतेय हेडसांड ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर ग्रामीण रुग्णालय येथे तालुक्यातील आशा सेविकांची आरोग्य सेविकांकडून होतेय हेडसांड ?

रावेर तालुका प्रतिनिधी  -विनोद हरी कोळी 

  रावेर तालुक्यातील जेमतेम मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयातील (Raver Rural Hospital) आरोग्य सेविकांच्या हलगर्जीपणामुळे सध्या खूप चकरा माराव्या लागत आहेत.[ads id="ads1"] 

       रावेर येथे प्रायव्हेट दवाखान्यात गरोदर माता प्रसूती झाली की (RH ) मधून नादेय  दाखला घ्यावा लागतो. परंतु तेथील आरोग्य सेविका वैद्यकीय अधिकारी हे नादे दाखला देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे जेमतेम मानधनावर काम करणाऱ्या चिनावल, खिरोदा, बुद्रुक, थोरगव्हाण,ऐनपुर ,लोहारा, वाघोड ,आणि निंभोरा.(  PHC) या आशा सेविका यांना  3ते 4 दिवस काम सोडून  (RH )आर एच मध्ये चकरा माराव्या लागतात. [ads id="ads2"] 

     त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो आणि जे एस वाय(JSY) लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास खूप वेळ होतो.त्यामुळे मातेस  ( JSY)चा लाभ मिळण्यास कधी कधी महिना ते दोन महिने लागतात. योग्य वेळेत लाभ मिळत नाही.याला जाबबदार कोण? तरी  वरिस्ट इनचार्ज डॉ ( ND महाजन) यांनी त्वरित लक्ष घालावे .तरी सर्व (आशा सेविका) यांना (RH) मधून नादेय दाखला देण्यास टाळाटाळ करू नये आणि आशा सेविका यांना वेळेतच प्रसूतीनंतर सात 7 दिवसाच्या आत नादेय दाखला देण्यात यावा, अशी मागणी रावेर तालुक्यातील सर्व आशा सेविकांकडून होत आहेत.

हेही वाचा: शिरसाळा मारुती दर्शनास गेलेल्या सावदा येथिल दोघे तरुण अपघातात ठार!

हेही वाचा : रावेर विधानसभा,लोकसभा सदस्यांचे 'स्वप्न' पाहणारे राजकीय भूतकाळ,वर्तमानकाळ भविष्यकाळाचा विचार करणार का..?

 तसेच ग्रामीण रुग्णालय रावेर येथे एखाद्या गरोदर मातेला प्रसूती च्या वेळेस (सिजर )करण्याचे वेळ आली तर? ग्रामीण रुग्णालय मध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. पण? त्या ठिकाणी त्या महिलेचे सिजर करण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे गरोदर मातेला प्रायव्हेट दवाखान्यात जाण्याची वेळ येते. त्यामुळे त्या महिलेचे खूप हाल सुद्धा होतात. आणि 40 ते 50 हजार रुपये सिजर साठी (प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये )मोजून द्यावे लागतात. अशी वेळ गरोदर मातेला येऊ नये म्हणून लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय रावेर येथे सिजर स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वरीस्ट  इनचार्ज ( ND)महाजन यांना  सुद्धा सर्व आशा सेविका आणि नागरिकांकडून होत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!