ग्राहकांमध्ये संतप्त भावना
यावल (सुरेश पाटील) कोणत्याही प्रकारचे वादळ, वारा,पाऊस नसताना वीज वितरण कंपनी यावल शहरात आपल्या ग्राहकांना रात्रंदिवस 'बे' टाईम 5 ते 7 वेळा देत आहे वीज पुरवठा खंडित करण्याचे बेकायदा झटके.यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
यावल शहरात वीज पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहण्यासाठी वितरण कंपनी पावसाळ्यापूर्वी ' ट्री ' कटिंगची कामे म्हणजे जागोजागी असलेल्या वृक्षांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याची कामे आपल्या सोयीनुसार आपल्याच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांतर्फे करीत असते. एक-दोन वर्षापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्यात जोराचा पाऊस,वारा किंवा वादळ असतानाच वीजपुरवठा तात्पुरता काही वेळे पुरता खंडित केला जात होता.परंतु आता कोणत्याही प्रकारचा वारा, वादळ पाऊस जोरात नसताना सुद्धा अनियमित वेळेला केव्हाही रात्री बे-रात्री पाच ते सात वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदा 5 मिनिटापासून 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा तास वीज पुरवठा अनियमित,मनमानी पद्धतीने खंडित केला जात आहे, त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या घरगुती,व्यवसायिक डॉक्टर,वकील इत्यादी सर्व स्तरातील ग्राहकांना मोठा अडथळा निर्माण होत असून वीज वितरण कंपनीच्या या बेकायदा वीज पुरवठा खंडित केला जाणाऱ्या झटक्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
वीज वितरण कंपनी आता 90% वीज ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली नियमित आणि वेळेवर करून घेत आहे वेळेवर वीज भरणा न केल्यास ग्राहकांच्या वीजपुरवठा खंडित सुद्धा केला जातो असे असताना तसेच वीज वितरण कंपनीने अधिकृतरित्या लोड शेडिंग जाहीर केलेले नसता. वीजपुरवठा दिवसातून पाच ते सात वेळा खंडित का होतो..? सब स्टेशनला उच्च दाब वाहिनीवरून वीज पुरवठा होताना वीज ट्रीप का होते..? आणि कोणत्या कारणामुळे सतत वीज ट्रीप होते..? आणि वीज पुरवठा कमी,जास्त दाबाने होत असल्यास जेवढा वीज पुरवठा आवश्यक आहे तेवढाच वीज पुरवठा का वीज कंपनीकडून का घेतला जात नाही..? असे अनेक प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात असून वीज वितरण कंपनीला ग्राहक हक्काचा/कायद्याचा झटका द्यावा लागेल का..? असे सुद्धा यावल शहरातील अनेक ग्राहकांमध्ये बोलले जात आहे.वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून याबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे सर्वत्र बोलले जात आहे.


