रावेर लोकसभा मतदारसंघात /सातपुड्यात सागवानी लाकडा सह वनउपजसंपत्तीची मोठ्या प्रमाणात तस्करी..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


दोन फर्निचर दुकानात वन विभागाची धाड ; कारवाई संशयास्पद की चमकोगिरी..?

यावल(सुरेश पाटील)

काल मंगळवार दि.1 रोजी मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांचे मार्गदर्शना खाली यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून यावल आणि किनगाव येथील दोन फर्निचर दुकानावर अचानक दाड टाकून वन विभागाने एकूण 80 हजार रुपये किमतीचे फर्निचर जप्त केले.या कारवाईमुळे सागवानी लाकडासह इतर लाकूड व्यवसाय करणारे आणि फर्निचर दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असली तरी झालेली कारवाई ही वन विभागाची चमकोगिरी आणि संशयास्पद असल्याचे संपूर्ण यावल- रावेर तालुक्यासह रावेर लोकसभा मतदारसंघात चर्चिले जात आहे कारण यावल वन विभाग कार्यक्षेत्रात आणि रावेर लोकसभा कार्यक्षेत्रात गेल्या कित्येक वर्षापासून हजारो फर्निचरची दुकाने आहेत.[ads id="ads1"] 

  या हजारो दुकानदारांपैकी फक्त दोन दुकानदारांवरच कारवाई का झाली..? यावल तालुक्यातून जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर पर राज्यात सागवानी लाकडासह सातपुडा जंगलातील वनउपज संपत्तीची अवैध चोरटी वाहतूक तस्करी सर्रासपणे सुरू असताना यावल काल वन विभागाला मिळालेल्या गुप्त खबरी वरून कारवाई केल्याचे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे याचाच अर्थ वन विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रात फर्निचरची दुकाने किती आणि कुठे आहेत..? त्या ठिकाणी आतापर्यंत तपासणी का केली नाही..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"] 

         काल यावल तालुक्यात दोन फर्निचर दुकानात वन विभागाची धाड टाकण्याच्या कारवाईत पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल सुनील भिलावे, यावल पूर्व वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी किनगाव येथील रामचंद्र पाटील यांचे अवैध फर्निचर दुकानावर वन कर्मचारीसह सापळा रचुन धाड टाकली असता त्यात दरवाजा फालके 08, पलंग 02, सोफा सेट 01, साग नग 72, चौरंग 04 ,तसेच लाकूड कट्टर मशीन 01, असा एकुण माल किंमत 75,000 जप्त करून मुख्य विक्री केंद्र यावल जमा केला.

सदर गुन्हा दाखल वनपाल वाघझिरा यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) (अ) (3), 41(2) अन्वये केला आहे.

सदर कार्यवाही वनक्षेत्र यावल पश्चिम व वनक्षेत्र रावेर  अधिनस्त स्टाफ यांनी संयुक्त रित्या केली.पुढील तपास वनपाल वाघझिरा हे करित आहेत.

        यावल वन विभागात जुन्या सागवानी लाकडाच्या पासेसवर नवीन सागवानी लाकडाचे दरवाजे खिडक्या इत्यादी सागवानी माल फक्त दोनच फर्निचर दुकानात विक्री होत आहे का..? यावल वन विभाग कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी वन विभागाची चेकिंग नाके आहेत,तपासणी साठी चेकिंग नाके असताना सुद्धा अवैध सागवानी लाकडाची वाहतूक सर्रासपणे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे हा मोठा संशोधनाचा आणि कार्यवाहीचा विषय आहे.यावल वन विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात का..? यांच्याकडे कोणत्याही माहितीसाठी संपर्क केला असता साहेब जंगलात गेले आहेत,साहेब मिटींगला गेले आहेत,साहेब बाहेरगावी आहेत असे वेगवेगळे उत्तरे दिली जातात म्हणजेच संबंधित काही अधिकारी हे आपल्या कार्यालयीन वेळेत केव्हा आणि कोणत्या दिवशी उपस्थित राहता. हा प्रश्न उपस्थित होतो.

-------------------------------------------------

कारवाईची माहिती देताना सुद्धा मतभेद आणि पक्षपातीपणा...?

      काल १ ऑगस्ट २०२३ रोजी यावल शहर किनगावात अवैध सागवान लाकूड पकडले,तसेच दोन फर्निचर दुकानात वन विभागाची धाड अशी माहिती देताना सुद्धा वन विभागाने आपल्या सोयीनुसार प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती देऊन इतर संबंधितांना पद्धतशीरपणे डावलले आहे यातून प्रसिद्धी माध्यमांत सुद्धा पक्षपातीपणा मतभेद केल्याचे दिसून आले आहे.यावल वन विभागाने माहिती देताना सर्वांना एकाच वेळेला समान माहिती द्यायला पाहिजे असे सर्वत्र बोलले जात आहे.

-----------------------------------------------------

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!