भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील विद्यार्थिनी सांची सारिपुत्र गाढे हिचा 10 वी मध्ये नूतन मराठा माध्यमिक विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी,वरणगाव मध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल प्रगतिक विचारमंच व डॉ. मानवतकर बहुुउद्देशिय संस्था भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने "गौरव यशवंतांचा" या कार्यक्रमामध्ये प्रशस्तिपत्र देऊन तिचे वडील सारीपुत्र गाढे व आई जयश्री गाढे यांच्या समवेत तिला गौरविण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रागतिक विचार मंच चे अध्यक्ष जे.पी.सपकाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खडका येथील हायस्कुल चे मुख्याद्यापक सुनील भिरूड हे होते तर व्याख्याते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राद्यापक.. जयेंद्र लेकुरवाले सर हे होते.तसेच कार्यक्रमांचे स्वागताध्यक्ष डॉ.राजेश मानवतकर हे होते.
तिचे वडील सारिपुत्र गाढे हे सुद्धा नेहमी सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात.तसेच बौद्ध धम्म सहलीचे आयोजन सुद्धा ते दरवर्षी आयोजन करीत असतात.[ads id="ads2"]
तिच्या या गौरवाने संपूर्ण तालुक्या सह,जिल्हाभरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर यश मिळणेकामी आर डी तायडे सर,डी पी तायडे सर,सुधीर वानखेडे सर,लवांडे सर,प्राचार्य भोईटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
गौरव यशवंताचा या कार्यक्रमाचे आयोजन प्रगतिक विचारमंच व डॉ. मानवतकर बहुुउद्देशिय संस्था भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. जतिन मेढे, मोहन सरदार,डॉ.राजेश मानवतकर, डॉ. सौ. मधू मानवतकर, समाधान जाधव, दिलीप सुरवाडे, प्रा. प्रशांत नरवाडे, देवेंद्र तायडे, अनिल बागुल, प्रशांत तायडे, संघरत्न सपकाळे, निलेश रायपुरे, मुकेश सोनवणे, विनोद बा-हे यांनी केले होते.


.jpg)