"बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राज्य महामार्ग हा पुलमुक्त आहे.म्हणून हा रस्ता टोल फ्री देखील असल्यामुळे या ना दुरुस्त खड्डेमय रस्त्याकडे सा.बां.विभाग व नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्ती निधी उपलब्ध असतानाही थेट दुर्लक्ष करतात.जळगाव नॅशनल हायवे कार्यालयात कंत्राटी पद्धतीचे अधिकारी बसतात व प्रमुख अधिकारी सर्व कारभार धुळे येथून चालवितात,यांची अकार्यक्षमताचा पहाडा आंदोलन स्थळी उपस्थित नॅशनल हायवेच्या अधिकारीला धारेवर धरून वाचून माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सदर विभागाच्या अधिकाऱ्याची पलकोल केली."[ads id="ads1"]
----------------------------------------
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- बुऱ्हानपूर अंकलेश्वर राज्य महामार्गवरील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा-फैजपुर या रस्त्यावर अनेक दिवसांपासून जागोजागी थेट मृत्यूला आमंत्रण देणारे खड्डे पडलेले आहेत.तरी याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी,यासंदर्भात सावदा येथील सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना त्रस्त जागरूक नागरिकांनी वेळोवेळी अर्ज सादर केलेले असून,याबाबत अनेकदा वृत्तपत्रांत देखील बातम्या प्रसारित करून सुद्धा या रस्त्याची दुरुस्तीसाठी सदर विभागाकडून कोणतीस ठोस उपायोजना आज तगायत करण्यात आलेली नाही.[ads id="ads2"]
तसेच या रस्त्याची दुरुस्ती का केली जात नाही,असा प्रश्न स्थानिक वार्ताहारांनी विचारले असता,हा रस्ता नॅशनल हायवे कडे वर्ग झाल्याचे सांगून सावदा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हातवर करून थेट नॅशनल हायवेकडे बोट दाखवतात,ही वस्तुस्थिती आहे.यादरम्यान ना दुरुस्त सावदा-फैजपुर रत्यावर झालेले अनेक लहान मोठे अपघातात काही वाहन चालकांचे जीव गेले तर काही जखमी लोकांना आपले नैसर्गिक अवयव गमवावे लागले. तरी अशी भयानक स्थिती पुन्हा पुन्हा येऊ नये,तसेच रस्त्याची दुरुस्ती तात्काळ व्हावी.म्हणून जनहिताकरिता नाईलाजाने दि.२३ सप्टेंबर रोजी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभला म्हणजे शहरातील पत्रकारांना साईबाबा मंदिर समोरील रस्ता रोको आंदोलन करावे लागले.या आंदोलनास विशेषकरून महामंडलेश्वर जनार्दन महाराज फैजपूर व कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास महाराज सावदा,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रावेर नायब तहसीलदार संजू तायडे सह सर्व सर्वपक्षीय नेत्यांनी आवर्जून पाठिंबा दिला,यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिणामी पत्रकारांच्या आंदोलनाची अखेर दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे खळीने बुजवण्यात आले. भविष्यात सदर रस्त्याची समस्या कायमची सोडवण्यात येईल असे आंदोलन स्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच आंदोलका ठिकाणी एपीआय जालिंदर पळे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


