रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे गणेशोत्सव निमित्ताने विद्यार्थिनीसाठी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ९ स्पर्धकांनी भाग घेतला मेहंदी. मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या [ads id="ads1"]
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे लागला
प्रथम क्रमांक - गावंडे सीमा रवींद्र
द्वितीय क्रमांक - येवले कोमल विनोद
तृतीय क्रमांक (विभागून )-महाजन भाग्यश्री भागवत, पाटील वैष्णवी नितीन [ads id="ads2"]
मेहंदी स्पर्धेच्या परीक्षकाचे काम प्रा .डॉ. रेखा पाटील आणि प्रा. सुषमा मोतेकर यांनी केले. मेहंदी स्पर्धेचे आयोजन युवती सभा सचिव डॉ. नीता वाणी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे . बी. अंजने, डॉ नीता वाणी, प्रा डॉ. रेखा पाटील यांनी केले.


