शाश्वत शेती पध्दती काळाची गरज -प्रा भूषण चौधरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर ( विनोद हरी कोळी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयातील केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत एक दिवशीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन  महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्ष ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भागवत विश्वनाथ पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. श्रीराम पाटील हे होते.या प्रसंगी उपाध्यक्ष श्री आर.एन.महाजन , सचिव श्री.संजय पाटील हे हजर होते.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी एकदिवसीय शेतकरी सहायता कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. [ads id="ads1"]

सदरील कार्यशाळेचे  उद्घाटक व तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. भूषण चौधरी  कबचौ उमवी जळगाव यांनी शाश्वत शेती  पद्धतीची गरज या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी हरितक्रांतीनंतर झालेल्या बदलांवर चर्चा घडवून आणली तसेच सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली व सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. तसेच रासायनिक खतांच्या आणि रासायनिक फवारणीचा मानवी जीवनावर व शेतीवर होणारा परिणाम याविषयी मत मांडले. दुसरे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विकास गीते, कबचौउमवि जळगाव यांनी कृषी नवकल्पनांमध्ये आयपीआर ची स्थिती आणि आव्हाने या विषयांवर शेतकऱ्याशी संवाद साधला .त्यांनी सद्यस्थितीत  शेतीतील आव्हाने यावरती चर्चा घडवून आणली. [ads id="ads2"]

  तसेच शेतकऱ्यांमध्ये नवकल्पनांना चालना देण्यासाठी त्यांनी पेटंट घ्यावे . पेटंट म्हणजे काय, पेटंट घेण्याची सविस्तर पद्धत याविषयी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्टार्टअप विषयी माहिती दिली. निंभोरा  ता . रावेर येथील  श्री गोविंदा सोनवणे यांनी आपल्या स्वतःच्या  स्टार्ट अप चा अनुभव शेतकऱ्यांसमोर कथन केला. यानंतर  दुपारच्या सत्रात कृषी विज्ञान केंद्र पाल येथील प्रा. महेश महाजन  यांनी शाश्वत शेतीसाठी माती पाणी आणि पर्यावरण  पूरक किड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.राम बायोटेकचे चेअरमन मा.श्री .पुष्कराज चौधरी  यांनी केळी टिशू तंत्रज्ञान यावर तर .मा.डॉ.राजेंद्र पाटील संचालक,राम बायोटेक यांनी केळी पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्या परिसरातील  तरुणांनी आपल्याकडे असणाऱ्या पिकावर संशोधन करून केळीच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडवावेत आणि आलेल्या प्रमुख वक्त्यांनी आमच्या भागासाठी मार्गदर्शन करावे असे  आवाहन केले . कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री दिलीप वैद्य पत्रकार  रावेर व मा.जितेंद्र पाटील प्रगतिशील शेतकरी  ऐंनपुर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रावेर येथील श्री दिलीप वैद्य यांचा केळी विषयी केलेल्या उल्लेखनीय लिखाणाबद्दल त्रिची  येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल  सन्मान करण्यात आला तर श्री.  जितेंद्र पाटील हे स्वातंत्र्यदिनी दिल्ली  येथे प्रगती शील शेतकरी म्हणुन   उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.जे पी नेहेते यांनी केले .तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस बी पाटील यांनी केला कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी मांडले. कार्यशाळेच्या समारोपात  श्री श्रीराम पाटील यांनी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत असताना त्या अडचणीवर उपाय म्हणून अशा तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते असे विचार मांडले. अनेक वेगवेगळे संशोधन झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले‌.  कार्यशाळेत १०९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. खुल्या चर्चा सत्रात शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न तज्ञ मार्गदर्शकांना विचारुन आपले समाधान करून घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ जे बी.अंजने, आजीवन अध्ययन व विस्तार  विभागचे समन्वयक प्रा डॉ महेंद्र सोनवणे, केळी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा डॉ एस ए. पाटील, प्रा डॉ एस बी पाटील आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर  कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!