रावेर तालुका (ग्रामीण) प्रतिनीधी(चांगो भालेराव) कर्जोद येथील तलाठी हे सजा वर बहुतेक वेळा उपस्थित नसतात. तसेच यांची मनमानी सुरूच राहणार का ? यांचा मनमानी कारभार सुरूच राहणार असेल तर लोकांचे कामे कोण करणार ? वरिष्ठ पातळीवरील अधिकारी त्यांना पाठीशी घालणार की त्यांचेवर काही कारवाई करणार हे पाहणे आता औसुख्याचे ठरणार आहे. तसेच वरीष्ठानी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. [ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात शेत ग .नं. २४१ हे . १ . ९ ७ आर आकार रुपये ७ . ५० पैसे शेत जमीनी च्या गांव . नमूना सात 12 उतार्यावर शेत जमीनीच्या इतर हक्कातील वारसांची नावे भोगवटादार / कब्जेदार सदरी दाखल करणे बाबत जलुबाई इसामुददीन तडवी रा . कर्जोद ता . रावेर यांनी कर्जोद येथील तलाठी रवि शिंगणे यांचे कडे दि . १0 / ७ /2023 रोजी ७ / १२ उतारा ड पत्रक नोंदी सह अर्ज केला असून त्या दिवसा पासुन अर्जदार ' त्यांचे बहिणीचा मुलगा वारंवार चकरा वाघोड सजेवर मारून सुद्धा तलाठी रवी शिंगणे दखल घेणेस तयार नाही.[ads id="ads2"]
वरीष्ठ मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार यांनी देखील भ्रमण ध्वणीद्वारे व समक्ष बोलवून इतर हक्कातील नावे कमी करणेस सांगीतले अस्ताना देखील . ऐकत नाही तरी तलाठी मनमानी राज चालवित असुन सजेवर थांबत नाही. असे सुद्धा बरेचदा निदर्शनास आलेले आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी तलाठी रवी शिंगणे यांचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचा : ट्रकने चिरडल्याने रावेर तालुक्यातील युवक जागीच ठार