रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून डिगंबर बोरसे अवघ्या 21 व्या वर्षी पूनखेडे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आले होते.
आता बोनस म्हणजे त्यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडल्याने सर्वात तरुण उपसरपंच होण्याचा मानही डिगंबर बोरसे यांना मिळाला आहे.सदर निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कीर्ती प्रवीण पाटील हे होते.[ads id="ads1"]
माजी उपसरपंच सुरेश गोपाळ चौधरी यांनी आपला कार्यकाळ संपताच उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत डिगंबर राजू बोरसे यांच्या विरोधात अर्ज न आल्याने डिगंबर बोरसे हे बिनविरोध विजयी झाले व त्यांची उपसरपंच पदी निवड झाली.[ads id="ads2"]
डिगंबर राजू बोरसे हे MBA च्या दुसऱ्या वर्षाचं IMR कॉलेज जळगाव येथे शिक्षण घेत आहे. काल झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत डिगंबर ची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उपसरपंचांची गावात फटाक्यांची आतिषबाजीत व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले.आपल्या शिक्षणाचा व पदाचा गावाच्या विकासासाठी वापर करुन अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा मानस डिगंबर बोरसे यांनी व्यक्त केला आहे.
त्यावेळी उपस्थित सरपंच कीर्ती प्रवीण पाटील, माजी उपसरपंच सुरेश चौधरी, सदस्य सूर्यकांत इंगळे,तंटा मुक्त अध्यक्ष रमेश सावळे ग्रामसेवक श्याम पाटील, पा.पू.कर्मचारी गोकुळ चौधरी,शिपाई प्रदीप गिरी, आकाश चौधरी,चेतन पाटील,धीरज सावळे,योगेश सावळे,भगवान बोरसे,भूषण कोळी व पूनखेडे ग्रामस्थ उपस्थित होते.


