सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान यांनी शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थ्यांनीचा वाईट हेतूने अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याची घटना केली असता[ads id="ads1"]
सदर प्रकरणाची कुठेच वाच्यता होवू नये,यासाठी तारेवरची कसरत करणारे मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान सह शाळेतील शिक्षक शेख फिरोज शेख सुपडू व शेख अर्शद शेख सईद या शिक्षकांविरुद्ध पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात दी.७ ऑगस्ट रोजी (फोस्को)कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.यातील मुख्य संशयित आरोपी अक्रम खान शिवाय कोणालाही अटक झाली नसल्याने अखेर मुख्याध्यापक सह हे दोघेही शिक्षक पोलीसांच्या हाती न लागता यांनी दि.१२ सेप्टेंबर रोजी स्वत:चे अटकपूर्व जामीन होण्याकरिता भुसावळ सत्र न्यायालयात अर्ज सादर केले होते.[ads id="ads2"]
तरी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान, शिक्षक शेख फिरोज शेख सुपडू व शेख अर्शद शेख सईद या तिघांचे अटकपूर्व जामीन आज दि.३० सप्टेंबर रोजी अखेर भुसावळ सत्र न्यायालयाने मंजूर केले आहे.


