निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीची कार्यकारणी गठित - अध्यक्षपदी चारुलताताई सोनवणे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीची कार्यकारणी गठित - अध्यक्षपदी चारुलताताई सोनवणे

   जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि .०१/१०/२०२३ रविवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेची जळगाव जिल्हा महिला आघाडीची बैठक पद्मालय विश्रामगृह जळगाव येथे संपन्न झाली.[ads id="ads1"]

        या बैठकीला उपस्थित संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना संघटनेच्या माध्यमातून समाजात कोणत्याप्रकारे काम करावे हे मार्गदर्शन केले तसेच जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी चारुलताताई सोनवणे तसेच नंदाताई भावटे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी व जिल्हा सचिव पदी वैशाली ताई हेरोळे यांची निवड करण्यात आली.[ads id="ads2"]

   व संघटनेच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून जळगावचे पल्लवीताई सोनवणे , रेखाताई भालेराव भुसावळचे नंदाताई भावटे , सिमाताई करनकाळ , चोपड्याचे प्रविण करनकाळ , धुळे जिल्हाचे राज्याभाऊ उमाळे यांनी संघटनेत प्रवेश केला त्याप्रसंगी सदाशिव निकम , अशोक तायडे , नंदाताई बाविस्कर , अनिताताई बाविस्कर , गिताताई वाघ , पिंकीताई सुतार , बबिताताई बाविस्कर , विलास तायडे , दिवानजी सांळुखे , सोनीताई जैन , अनिताताई वार्डे , लक्ष्मीताई मेढे , विदया बाविस्कर तसेच असंख्य पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!