प्रशासना कडून वेळीच उपाययोजना करण्याची गरज
रावेर (प्रशांत गाढे) रावेर तालुक्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणत आढळत आहेत...या आजारास प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून व ग्राम पंचायत कडून डेंग्यू हा जास्त पसरू नये म्हणून काही उपाय योजना करतांना दिसून येत नसल्याने डेंग्यू मोठ्या प्रमाणात पसरत आहे .जागोजागी पडलेला कचरा त्वरित उचलावा तसेच डेंग्यू च्या प्रतिबंधात्मक योजना त्वरित राबवण्यासंदर्भात ग्रामपंचायत यांना कडून राबवून का घेत नाही असा सूर नागरिकांना कडून येत आहे.[ads id="ads1"]
डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने डेंग्यू सारख्या साथ रोगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत तरी डेंग्यू हा साथ रोग संपुर्ण रावेर तालुक्यात डोके वर काढू पहात आहे नुकतेच डेंग्यू चे रुग्ण काही गावात आढळून आले आहेत. गावठाणात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत तसेच नागरिक मोकळ्या व पडीक जागेत कचरा टाकत आहे यातच अधे-मधे होणाऱ्या पावसामुळे सदर कचऱ्याचे ढीग हे डासांचे उत्पत्तीस्थान ठरत आहे.[ads id="ads2"]
यामुळे नागरिकांचे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथ रोगांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ डेंग्यू चे प्रतिबंधात्मक उपाय करावे तसेच जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग उचलून गावोगावी मध्ये धूर फवारणी करावी तसेच सदर साथ रोगाबाबत तालुक्याच्या आरोग्य विभागाला कळवून योग्य त्या उपयोजना कराव्यात आणि जनतेत या साथ रोगाबाबत जनजागृती करावी अशी मागणी नागरीकां कडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी