गटारी अभावी वापराचे घाण पाणी रस्त्यावर
यावल (सुरेश पाटील) यावल येथे यावल भुसावळ रस्त्यावर टी पॉईंट जवळ सम्राट मॉल समोर फ्रुट सेल सोसायटीच्या पत्री कॉम्प्लेक्स मधील वापराचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने प्रचंड प्रमाणात वर्दळ,रहदारी असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दिवस रात्र सुरू असलेल्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,याबाबत यावल सार्वजनिक बांधकाम विभाग,यावल नगरपरिषद आंधळ्याची,निष्क्रियतेची भूमिका निभावत असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.[ads id="ads1"]
वरील नमूद ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याचे तसेच रस्त्यावर वापराचे घाण पाणी कसे वाहत आहे वाहतुकीस कसा अडथळा निर्माण होत आहे..? याचा प्रत्यक्ष अनुभव यावल तहसीलदार सौ.मोहनमाला माला नाझीकर यांना आज शुक्रवार दि.६ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शासकीय वाहनातून आला असेलच..? यावल नगरपरिषद आणि यावल सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी टी पॉईंट पासून भुसावळ कडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूने आजूबाजूच्या व्यापारी संकुलनातील व विकसित भागातील वापराचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटारीचे बांधकाम केले आहे किंवा नाही आणि वापराचे घाण पाणी वाहून का जात नाही याबाबत यावल तहसीलदार यांनी यावल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना लेखी आदेश वजा पत्रव्यवहार करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत कशी होईल..? रस्त्यावर पडलेले खड्डे बुजण्याबाबत व येणाऱ्या अडचणी बाबत,आणि अपघातात जीवित हानी होऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.[ads id="ads2"]
यावल भुसावळ रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे,यावलकडून भुसावळ कडे जाताना उजव्या बाजूने ठेकेदाराने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी साईट पट्ट्यांवर मुरूम,खडी टाकून
पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बाजूला जे मोठे खड्डे पडले आहेत ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता शाखा अभियंता ठेकेदारांना यांना दिसून येत नाहीत का.? किंवा ते जाणून बुजून आंधळ्याची भूमिका घेत आहेत का ? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याकडे लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना सुद्धा गप्प असल्याने वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी