यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी तालुकास्तरीय व ग्रामीण भागात कार्यालयात अनेक अधिकारी,कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यालयात जागेवर उपस्थिती नसल्याने या काही अधिकारी,कर्मचाऱ्यांची दिवाळी,पाडवा अद्याप संपलेला नाही का..? यांनी रीतसर रजा टाकलेली आहे का..? याकडे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.[ads id="ads1"]
यावल पंचायत समिती कार्यालय.वन विभाग, पाटबंधारे विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद पाणीपुरवठा व बांधकाम विभाग व तालुक्यातील काही तलाठी कार्यालयात आणि अनेक ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित काही ग्रामसेवकांची उपस्थित आढळून येत नसल्याने तालुक्यातील नागरिकांची मोठी भटकंती होत आहे या काही गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रीतसर सुट्टीचा अर्ज टाकला आहे का..? [ads id="ads2"]
किंवा कार्यालयीन कामानिमित्त कुठे आणि कोणत्या ठिकाणी बाहेर आहेत याची रीतसर नोंद कार्यालयात केलेली आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न तालुक्यात उपस्थित केले जात असून जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून आपले तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी नेमके कोणत्या ठिकाणी कार्यरत आहेत याची खात्री करून कार्यवाही करावी असे सुद्धा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.


