सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा हे शहर प्रगतिशील व बनाना सिटी म्हणून ओळखला जातो.असे असताना दगडफेकीसारख्या घटनांमुळे शहराच्या लौकिकाला बट्टा लागेल असे काहीही करू नका!अशा मार्मीक शब्दांमध्ये सावदा पोलिस ठाण्यात घेण्यात आली.[ads id="ads1"]
शांतता कमेटीच्या बैठकीत नुतन प्रांताधिकारी देवयानी यादव सह तहसीलदार बंडू कापसे,डीवाय एसपी राजकुमार शिंदे,एपीआय जालिंदर पळे यांनी आवाहन केले.काल रात्री घडलेल्या दगडफेकीनंतर सदरील अधिकारी व सर्वपक्षीय मान्यवर,पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.


