रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे आज दि . ८/१/२०२४ रोजि निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.[ads id="ads1"]
या बैठकीमध्ये संघटनेच्या पुढील वाटचाली करीता सुचना देण्यात आल्या तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या करीता सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे दारुमुळे समाजात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या करिता अवैध दारू विक्री बंद केल्या शिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्त बसु नये.[ads id="ads2"]
तसेच संघटनेच्या पुढील वाटचाली करिता फैजपुर उपविभागीय अध्यक्ष पदी सुधिर सैगमिरे रावेर तालुका नियोजन समिति अध्यक्ष विजय धनगर तर रावेर तालुका युवक अध्यक्ष पदी राकेश तायडे यांची निवड करण्यात आली त्या प्रसंगी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख धनराज घेटे ' जिल्हा उपाध्यक्ष नंदा भावटे . जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम . जिल्हा उपप्रमुख अशोक तायडे . व इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.