रंगतरंग स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यातील वाघळूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केल्याने पालक वर्गांमध्ये कौतुक करण्यात आले.तसेच या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे साठी भर द्यावा अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी दिली.[ads id="ads1"] 

या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीची यावलचे संचालक दिपक चौधरी,शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन तेजस धनंजय पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ज्ञानदेव बोरोले,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद सपकाळे,ग.स.सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, संजय ताडेकर,कमलेश नेहेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.[ads id="ads2"] 

       कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते थोर पुरुषांचे व रंगदेवतेचे पूजन करण्यात आले.यानंतर प्रास्ताविकात मुख्याध्यापक अमित पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला.तसेच शाळेत सुरू असलेल्या विविध नवो उपक्रमाची माहिती पालकांना दिली.

  विद्यार्थ्यांनी यावेळी एकांकिका,सामूहिक नृत्य,वैयक्तिक नृत्य,नाटिका व समाजासाठी उपदेश असलेले नाटिका सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली.आदर्श विद्यार्थी म्हणून ओम सुरेश पाटील,रिद्धीशा धनराज सनेर यांना सन्मानित करण्यात आले.प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष ज्योती दीपक पाटील, तज्ज्ञ संचालक तथा शिक्षण प्रेमी निखिल सपकाळे, राजू पाटील,रूपेश पाटील,हर्षवर्धन मोरे व सर्व युवक मंडळ व ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन राहुल भारंबे यांनी केले. आभार दीपक वारके यांनी केले.

          या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या निमंत्रित सत्कारार्थी यांचा शाळेतर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ.जगदीश पाटील, कल्पना माळी,प्रसन्ना बोरोले, संतोष मराठे,अमित चौधरी, शैलेंद्र महाजन,अतुल चौधरी गौरव करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!