भुसावळ येथे १२ एप्रिल रोजी संविधान बचाव-देश बचाव मेळावा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- भुसावळ येथे १२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता रजा टावर या परिसरात संविधान बचाव-देश बचाव अंतर्गत भव्य अशी जाहीर सभा होणार असून,या सभेपूर्वी सायंकाळी संविधान निर्माते प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भुसावळ शहरातील पुतळ्यापासून केंद्रीय संविधान भवन कार्यालय भीमालय येथून ते थेट रजा टावर या सभास्थळ पर्यंत संविधान गौरव तिरंगा रॅली देखील काढण्यात येईल.

  तरी ही रॅलीचे नेतृत्व सह या सार्वजनिक जाहीर सभामध्ये खानदेश व महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री जगन भाऊ सोनवणे यांची तोफ धडाळनार असून,येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जगन सोनवणे यांनी केल्याची माहिती माजी.नगरसेविका सौ.पुष्पाताई जगन सोनवणे यांनी माध्यमांना दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!