सावदा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त करदात्यांचा खेळमांडला!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



"सदरील संपूर्ण प्रकार पालिकेचे नुतन मुख्याधिकारी भुषण वर्मा यांना भेटून सोहेल खान,फरीद शेख,युसूफ शाह यांनी निदर्शनास आणून दिले असता त्यांनी याची दखल घेऊन या टंचाईग्रस्त भागातील पाणी समस्या तातडीने उपाययोजना करुन मार्गी लावणे बाबत पाणीपुरवठा विभागाचे अवी पाटील यांना सांगितले आहे."

------------------------------------------------------

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- येथील नगरपालिका हद्दीतील ताजुशशरिया नगर,रजानर,पनापिर नगर या रहिवासी भागात सन २०२३च्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उद्भवलेली पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठ कन्या शाळा येथील विहीरीतून पाण्याची पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने पालिकेने सरासरी ६५ हजार रुपये खर्चून त्यातील गाळ,दगड काडले.पंरतू पाण्याची पातळी वाढली नाही.तरी बोअरवेल केल्याशिवाय सदरची पाणी समस्या सुटू शकत नसल्याची बाब त्यावेळी समजली असता समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान,फरीद शेख,युसूफ शाह यांचे शिष्टमंडळाने तात्कालीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना पाणी समस्या तातडीने सुटावी म्हणून त्यावेळी निवेदन देले.[ads id="ads1"]  

  परिणामी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे सह निवेदन देणारे शिष्टमंडळाने डायमंड इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून सेठ यांचेशी चर्चा केली.असता विनाविलंब त्यांनी स्वत:ची खाजगी कुपनलिकाचे पाणी साधरणता ३ महिने पर्यंत या टंचाईग्रस्त भागांना दिले.

सदर कुपनलिकेचे पाणी फक्त १५ दिवसांसाठी मिळाले तर यादरम्यान या विहीरीत नविन बोअरवेल टाकून उद्धभवलेली पाणी टंचाई कायमची सुटतील असे यावेळी न.पा.पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी आश्वासन दिले होते.[ads id="ads2"]  

  पंरतू संपूर्ण वर्षभरात या विहिरीत बोअरवेल करण्यात आली नसल्याने चालू उन्हाळ्यात सदरील भागात पुन्हा निर्माण झालेली पाणी टंचाईला फक्त आणि फक्त पालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा कारणीभूत असून,त्यांनी एका प्रकारे या टंचाईग्रस्त भागातील करदात्यांचा खेळ मांडला असून,या वस्तू स्थितीवर न बोलता चिडीचूप राहणाऱ्या तथाकथित लोकसेवक समस्या सुटो की न सुटो परंतु येथील टंचाईग्रस्त लोकांना सोबत घेऊन पालिकेत आणून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील.कारण की हे आयता विषय या कामचुकार अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी पुन्हा जन्माला आणला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!