Ladki Bahin Yojana Maharashtra Government विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) बनले आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले.आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.[ads id="ads1"]
खात्यात १५०० की २१०० रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये रंगलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांनी खात्यावर पैसे कधी जमा होणार याबाबत भाष्य केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता हे अधिवेशन संपताच जमा केला जाईल', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना म्हंटले आहे.[ads id="ads2"]
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत. कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही.
ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत', अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.




