चार चाकी वाहनांने झाडाला जोरदार टक्कर दिल्याने रावेरच्या तीन जणांचा मृत्यु तर दोघे जण गंभीर जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 चार चाकी वाहनांने झाडाला जोरदार टक्कर दिल्याने रावेरच्या तीन जणांचा मृत्यु तर दोघे जण गंभीर जखमी

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सावदा-भुसावळ महामार्गावर (Savada -Bhusawal Highway) पिंपरूळगावा (Pimprud) नजिक मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातामध्ये  रावेर शहरातील (Raver  City) तीन युवकांचा दुदैवी मृत्यु झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी आहे.या सदर दुःखद घटनेची बातमी समजताच रावेर शहरात (Raver City) एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]

या बाबत सविस्तर असे  वृत्त असे की भुसावळ (Bhusawal) कडून सावदा मार्गे रावेर (Raver)  कडे येत असतांना MH २० CS ८००२ गाडी भरधाव वेगाने झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील (Raver)  शुभम सोनार (वय २५) मुकेश रायपूरकर (वय २३) व जयेश भोई हे जागीच ठार झाले. तर इतर गणेश भोई(फोटोग्राफर) सह अजुन एक जण गंभिर जखमी असुन जळगाव येथिल हॉस्पिटल (Jalgaon Civil Hospital) येथे मृत्यूशी झुंज देत आहे.[ads id="ads2"]

सदर या दुर्घटनेची वार्ता  संपूर्ण रावेर शहरात(Raver ) पसरताच एकच खळबळ उडाली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुठलातरी कार्यक्रम आटपून घरी येत असताना रात्री दोन वाजता पिंपरुड सावदा (Pimprud - Savda) दरम्यान ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. हा अपघात इतका भीषण आहे की चार चाकी अक्षरशः गाडीचा चकणाचुर झाला आहे.

हेही वाचा : Mumbai: Elephanta Caves News : नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

हेही वाचा : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती

हेही वाचा: महावितरणच्या सावदा विभागाच्या महिला सहाय्यक अभियंत्यासह, लाईनमन व तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात : महावितरणच्या गोटात मोठी खळबळ

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!