जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : चोपडा शहरातून (Chopada City) गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेली संजना गुड्या बारेला वय-९ या मुलीचा मृतदेह हतनुरच्या उजव्या कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात (Chopda City Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की, संजना गुड्या बारेला वय-९ रा.साईसिध्दी पार्क, चोपडा ता.चोपडा जि. जळगाव (Copda Dist Jalgaon) ही चोपडा शहरातील धनवाडी रोडकडील पाटाच्या पाण्यात बुडून मयत झाल्याचे समोर आले. दरम्यान मृतदेह चोपडा उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान हा घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहेत.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती



